आम्ही लऊळकर
लऊळ गावाची डिजिटल ओळख
◆ आम्ही लऊळकर ◆

गावाबद्दल

माढा तालुका, सोलापूर जिल्हा — आमची ओळख
🚉 कुर्डुवाडी जंक्शनपासून सुमारे ६ कि.मी.
🏙️ सोलापूरपासून सुमारे ८१–८५ कि.मी.
🌆 मुंबईपासून सुमारे ३८० कि.मी.

लऊळ हे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील एक गाव आहे. आम्ही लऊळकर हे या गावाच्या नागरिकांनी, गावाच्या नागरिकांसाठी तयार केलेले डिजिटल व्यासपीठ आहे — गावाचा इतिहास, संस्कृती, माणसे आणि भविष्यातील विकास एकत्र आणणारे.

🏡 स्थानिक प्रशासन : लऊळमध्ये पंचायतराज प्रणाली अंतर्गत ग्रामपंचायत कार्यरत असून गावाच्या स्थानिक विकासाची जबाबदारी ग्रामपंचायतीमार्फत पार पाडली जाते.

👨‍👩‍👧‍👦 लोकसंख्या : २०११ च्या जनगणनेनुसार:
एकूण लोकसंख्या : ७,५१६
👨पुरुष : ३,९७१
👩महिला : ३,५४५
कुटुंबे : १,५२३
एकूण क्षेत्रफळ : ४,४५८ हेक्टर

🌟 लऊळची अभिमानास्पद व्यक्तिमत्त्वे
श्री प्रतापराव शंकरराव नलवडे – माजी उपसभापती, माढा पंचायत समिती
श्री पवन भोंग – सरपंच, ग्रामपंचायत लऊळ
सौ. मनीषा चंद्रकांत गवळी – उपसरपंच, ग्रामपंचायत लऊळ

🏛 लोकसभा : धैर्यशील मोहिते-पाटील (खासदार, माढा लोकसभा मतदारसंघ)(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार))

🏛 विधानसभा अभिजीत धनंजय पाटील (आमदार, माढा विधानसभा मतदारसंघ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)

🏛 बबनराव विठ्ठलराव शिंदे (माजी आमदार, माढा विधानसभा मतदारसंघ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

🏛 जिल्हा परिषद श्री शिवाजी कांबळे (जिल्हा परिषद सदस्य, मोडनिंब गट) भारतीय जनता पक्ष

🏛 पंचायत समिती सौ. सोनाली माळी (पंचायत समिती सदस्य, लऊळ गण) भारतीय जनता पक्ष

📍
भौगोलिक स्थान
माढा तालुका, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र राज्य
🌾
मुख्य व्यवसाय
शेती व कृषी आधारित व्यवसाय
🛕
धार्मिक स्थळे
संत कुर्मदास महाराज मंदिर व इतर ऐतिहासिक मंदिरे
👨‍👩‍👧‍👦
समुदाय
एकत्रित, सहकार्याची भावना असलेला समाज
❋ ◆ ❋ ◆ ❋ ◆ ❋ ◆ ❋
◆ उद्दिष्ट ◆
आम्ही लऊळकर का?
🏛️
वारसा जपणे
गावाचा इतिहास, परंपरा आणि आठवणी पुढच्या पिढ्यांसाठी जतन करणे
👥
माणसे जोडणे
गावातील आणि गावाबाहेर राहणाऱ्या लऊळकरांना एकत्र आणणे
💡
विकासाला चालना
समुदायाच्या सहभागातून गावाच्या विकासाची दिशा ठरवणे
🎓
कौशल्य व मार्गदर्शन
व्यावसायिक निर्देशिकेद्वारे तरुणांना मार्गदर्शन उपलब्ध करणे
🌿
तुम्हीही लऊळकर आहात का?

निर्देशिकेत सामील व्हा आणि आपल्या गावाच्या डिजिटल ओळखीचा भाग बना.

निर्देशिकेत सामील व्हा